Corporate Banner - marathi

Corporate Home

आपण यांपैकी कोण आहात?


कार्यक्षम   तरूण

कॉर्पोरेट कंपनी

एका तरुण देशाला आम्ही देत आहोत, त्याच्या अत्यंत उज्ज्वल भवितव्याची हमी !


सातत्याने विकसित होत असणाऱ्या आजच्या रोजगार क्षेत्रामध्ये, जेंव्हा करिअरची निरनिराळी क्षेत्रे ही अत्यंत अनाकलनीय बनत चालली आहेत, तेंव्हा देशातील विद्यार्थी, तरुणाई व सेवा कर्मचाऱ्यांकडे विशेष प्रकारची कौशल्ये, क्षमता, व पात्रता असणे हे अत्यावश्यक बनले आहे.

आमची, शास्त्रीय संशोधनावर आधारित, व दीर्घ काळ सिद्ध झालेली विविध उत्पादने, प्रत्येक व्यक्तीस, त्याची 'वर्तमान कौशल्य स्थिती' जाणून घेण्यास मदत करतात, तसेच यशस्वी भवितव्यासाठी लागणाऱ्या कौशल्ये व क्षमतांच्या विकासासाठी, आवश्यक अशी मॉडेल्स व पद्धती सुद्धा उपलब्ध करून देतात.

विद्यार्थ्यांची 'कौशल्य आधाररेखा' ठरविणे

तरुण व सेवा कर्मचाऱ्यांचे
'कौशल्य विश्लेषण'

बौद्धिक व मानसिक कौशल्ये विकास

शैक्षणिक कामगिरीच्या विकासासाठी
कौशल्यवृद्धी

ऑन-लाईन कौशल्य सुधारणा ट्रॅकिंग

कर्मचाऱ्यांच्या
रोजगार क्षमतेत वाढ

कौशल्ये व क्षमता विकास - एंटेल्की विचारधारा

आजच्या ज्ञानाधिष्ठित अर्थव्यवस्थांमध्ये, कोणत्याही देशाचा 'कुशल व सक्षम कर्मचारीवर्ग' हा त्या देशाच्या आर्थिक व सामाजिक विकासाचा एक अत्यंत महत्वाचा घटक ठरणार आहे. देशातील कर्मचाऱ्यांच्या कौशल्ये व क्षमता वृद्धीचे प्रयत्न, हे आज, श्रमिक बाजारामध्ये आढळणाऱ्या, 'लाखो तरुण एकाच वेळी नोकरी शोधत आहेत, तर नियोक्ते आवश्यक कौशल्य मनुष्यबळ शोधण्यात असमर्थ ठरत आहेत' या विसंगतीच्या दृष्टीकोनातून पाहिले पाहिजेत.

कौशल्ये व क्षमता वृद्धी ही प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातील एक सातत्यपूर्ण व प्रदीर्घ प्रक्रिया आहे. विविध कौशल्ये शिकण्याची व त्यांत प्राविण्य मिळविण्याची प्रक्रिया ही अत्यंत बालपणापासून सुरुवात होऊन मनुष्याच्या आयुष्याच्या अंतापर्यंत चालू असते.

म्हणूनच, देशाच्या कर्मचारीवर्गाची सुयोग्य कौशल्य वृद्धी हा, श्रमिक बाजारातील वर उल्लेख केलेल्या विसंगतीवरील, सर्वात प्रभावी उपाय आहे.

शाळापूर्व बालविकास

प्रत्येक व्यक्तीच्या मेंदूचा विकास, हा, त्या व्यक्तीच्या आयुष्यातील पहिल्या पाच वर्षांमध्ये, त्याच्या जीवनातील इतर कोणत्याही कालावधीपेक्षा, सर्वात जास्त जलद गतीने होतो. जागतिक आरोग्य संघटना आणि युनिसेफ यांचेनुसार, शाळापूर्व बालपण हा, त्या व्यक्तीची बुद्धिमत्ता, व व्यक्तिमत्व विकास, सामाजिक वर्तन आणि स्वतःहून शिकण्याची आणि जाणून घेण्याची क्षमता, यांच्या अनुषंगाने, एक अत्यंत महत्वपूर्ण टप्पा आहे.

व्यक्तिगत 'कौशल्य विश्लेषण'

ह्या जगात, ज्ञानी व सक्षम व्यक्ती, प्रयत्नपूर्वक साध्य करू शकत नाहीत, असे काहीही नाही. उच्च माध्यमिक विद्यार्थी, पदवी न मिळवलेले विश्वविद्यालयाचे विद्यार्थी, आणि सेवा कर्मचारी यांचेकरता एंटेल्कीने विकसित केलेल्या, व्यक्तिगत 'कौशल्य विश्लेषण' चाचण्यांद्वारा, त्यांच्या सध्याच्या स्थितीवर आधारित, अत्यंत शास्त्रीय पद्धतीने तयार केलेले संपूर्ण SWOT विश्लेषण त्यांना उपलब्ध केले जाते.

विद्यार्थी कौशल्ये व क्षमता वृद्धी

सातत्याने विकसित होत असणाऱ्या आजच्या रोजगार क्षेत्रामध्ये, जेथे पदवी प्रमाणपत्र सुद्धा अपुरे पडू लागले आहे, विद्यार्थ्यांना आणि तरुणांना, विशेष प्रकारची कौशल्ये, व क्षमता आत्मसात करणे अत्यावश्यक बनले आहे, ज्यायोगे त्यांची केवळ शैक्षणिक कामगिरी आणि एकूण स्पर्धात्मकताच नव्हे तर रोजगारक्षमताही वाढेल.

आमचे ग्राहक आमच्याविषयी हे म्हणतात!

एंटेल्कीचा कार्यक्रम उत्तम आहे आणि आमच्या सर्व शाळांमध्ये तो राबविला गेला पाहिजे.

आमच्या विद्यार्थ्यांची स्वतंत्रपणे विचार करण्याची क्षमता, आकलन, कारणमीमांसा व जिज्ञासूपणा यांच्यात सुधारणा झाली आहे. त्यांचे आत्मविश्वास सुधारले आहेत. एकलकोंडे विद्यार्थी आता वर्गाच्या उपक्रमात सहभागी होऊ लागले आहेत.

ज्ञानात वाढ झाल्याचा आणि त्यांच्या अध्यापनाच्या तंत्रात सकारात्मकता आल्याचा अनुभव शिक्षकांना आला. विद्यार्थ्यांच्या शिकण्याच्या उत्साहात सुधारणा झाली आहे. मुले आता अधिक लक्ष केंद्रित करीत आहेत.

- सौ रंजना तासकर, उपाध्यक्ष उषाताई लोखंडे ट्रस्ट

एंटेल्कीकडे मुलांना घडवण्याची शास्त्रोक्त पद्धत आहे!

माझ्या मुलीचा विकास करण्यासाठी मी एखाद्या शास्त्रोक्त रीतीने तयार केलेल्या पद्धतीच्या शोधात होतो आणि माझा शोध एंटेल्कीपाशी येऊन थांबला. माझी मुलगी एंटेल्कीचे सर्व उपक्रम आनंदाने करते आणि तिची अभ्यासातील गोडी खूपच वाढली आहे! गणित हा आता तिचा आवडता विषय झाला आहे. ती शिस्तबद्ध तर झाली आहेच, शिवाय स्वतःची कामे स्वतःच करू लागली आहे. मी निश्चितपणे सर्व पालकांना या प्रणालीची शिफारस करतो जेणेकरून ते देखील माझ्यासारखाच त्यांच्या मुलांना विकसित करण्यातील आनंद घेऊ शकतील !

- श्री प्रफुल्ल द्रविड, पुणे

एंटेल्कीने दिलेल्या 'सुधारणा घडविण्यासाठीच्या सूचनांमुळे' मला कमकुवतपणात सुधारणा आणता आल्या!

इतर प्रत्येक विद्यार्थ्याप्रमाणे, मीसुद्धा माझ्या करिअरविषयी निर्णय घेताना गोंधळून गेले होते. एंटेल्कीची 'व्यवसाय मार्गदर्शन चाचणी' हा सर्वोत्तम उपाय होता. मला माझ्या बलस्थानांबद्दल व कमकुवतपणा बद्दल माहिती मिळाली आणि त्यानुसार करिअर सुचविले गेले होते. या चाचणीतील 'सुधारणा घडविण्यासाठीच्या सूचना' या वैशिष्ट्यामुळे मी माझ्या कमकुवतपणात सुधारणा घडवून आणण्यात सक्षम झाले. मी सर्वांना या चाचणीची शिफारस करते !

- वेदांती गोडबोले